What Should Be Done to Increase Cotton Production? | कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी काय करावे ?

कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी काय करावे ?

नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईट वरती तुमचं स्वागत आहे , नुकतीच काही शेतकऱ्यांची पेरणी ही आटोपली आहे , विविध भागांमध्ये पाणी न आल्यामुळे पेरणी बाकी आहे . मित्रांनो जे शेतकरी कापूस लागवड करणार आहेत अशा शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलो आहोत. प्रत्येक शेतकरी मित्राला आशा असते की त्याला दुप्पट उत्पादन झाले पाहिजे तर यावरच आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आपण मांडणार आहोत ते तुम्ही जर केले तर नक्कीच तुमचे कापसाचे उत्पादन डबल होईल.

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होते आणि ज्या भागांमध्ये कापसाची लागवड केल्या जाते त्या भागामध्ये जास्त उत्पादन पाहण्यास मिळत नाही , यासाठी बरीचशी कारणे आहे , कधीकधी शेतकरी मित्र पिकाकडे लक्ष देत नाहीत किंवा वातावरण बदलल्यामुळे पिकावर परिणाम होतो तर अशा परिस्थितीत जास्त पीक होत नाही चला तर आपण पुढे पाहूया पुढील मुद्द्यांच्या माध्यमातून आपण आपल्या शेतामधील पिकाचे उत्पादन कशाप्रकारे वाढवू शकतो.

मित्रांनो सर्वच पिकाला पाणी अत्यंत आवश्यक असते आणि योग्य पिकाला योग्य पाणी मिळाले तरच पीक चांगले राहते जर पाणी जास्त झाले तर पिक खराब होते तर पाण्याचा पुरवठा हा थोड्या प्रमाणात मिळायला हवा.

कापूस लागवडीच्या देखील विविध पद्धती आहेत . आणि ह्या पद्धती कोरडवाहू शेतीसाठी अलग आहेत आणि हलक्या जमिनीमध्ये करण्यासाठी अलग आहे तर याकडे जर आपण लक्ष दिले आणि या प्रकारानुसार जर लागवड केली तर नक्कीच चांगले पीक होईल.

सर्वच शेतकरी मित्र पाण्याकडे लक्ष देऊन पीक पेरणी करतात मात्र जेवढी पेरणी ही उशिरा होईल तेवढेच पीक हे कमी येईल याकडेही शेतकरी मित्रांनी लक्ष दिले पाहिजे आणि पेरणी लवकर केली पाहिजे.

कापूस पेरण्याची एक योग्य पद्धत असते जसे की एका एकर मध्ये विविध अंतरावर जेवढी पेरणी केल्या जाते ती तेवढीच करावी अन्यथा उत्पादनामध्ये बदल होतो.

कापसाची योग्य ती लागवड करताना दोन झाडांमधील अंतर योग्य प्रमाणामध्ये ठेवावे .

कापूस या पिकाला पाणी फार आवश्यक असते त्यामुळे पाण्याची योग्य सोय ही शेतकरी मित्रांनी केली पाहिजे.

मित्रांनो जर आपल्याला कापसाचे पीक ही कोरडवाहू शेतीमध्ये घ्यायचे असेल तर आपल्याला बियाण्याची योग्य निवड करावी लागते. कमी कालावधीमध्ये येणारे बियाणे आपल्याला निवड करावी लागते. योग्य अंतर देखील पिकामध्ये असले पाहिजे तर अशा पद्धतीने पिकांमध्ये लक्ष ठेवावे लागते.

आपल्याला पेरणी करताना बी हे दोन ते तीन सेंटीमीटर खोलीवर टाकावे लागेल यामुळे पीक हे बरोबर येते. आणि पाणी दिल्यास ते बाहेर येत नाही.

तर अशा पद्धतीने आपल्याला पिकाची काळजी घ्यावी लागते धन्यवाद !

Leave a Comment