What is the market price of cotton going on? | कापसाचे बाजार भाव काय चालू आहे .

कापसाचे बाजार भाव काय चालू आहे .

नमस्कार मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवस कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय कठीण होते. त्यावेळी कापसाचे भाव कमी होते. मित्रांनो जून मध्ये आपण कापसाचे नवीन पेरणी करतो. त्यामुळे काही दिवसा आधीचा जो कापूस असतो तो आपल्याला विकावा लागतो आणि यालाच मागील काही महिन्यांमध्ये खूप कमी दर मिळाला आहे.

मागील काही दिवसांमध्ये कापसाचे दर खूप कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप तोटा सहन करावा लागला आणि नुकसानही झाले. मित्रांनो आता खूप कमी शेतकऱ्यांकडे कापूस राहिलेला आहे कारण बाकीच्यांनी बाजारामध्ये विकला सुद्धा आहे. तर मित्रांनो जेव्हापासून जून महिना लागला त्यापासूनच कापसाच्या घरामध्ये सुधारणा दिसत होती आणि मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वी यामध्ये 600 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना अपेक्षा लागली आहे की कापसाचे दर वाढतील.

मित्रांनो कापसाला सात हजार पाचशे ते सात हजार सातशे रुपये दर मिळाला होता पण आता कापसाचे दर हे 8000 च्या जवळपास गेलेले आहेत . मागील आठवड्यात हे धर सात हजार रुपयांच्या खाली होत. तर आता शेतकऱ्यांना आठ हजार रुपये भाव तरी मिळाला पाहिजे.
धन्यवाद !

Leave a Comment