Tushar Sinchan Yojana 2023 | तुषार सिंचन योजना 2023

Tushar Sinchan Yojana 2023 तूषार सिंचन योजना 2023- तुषार सिंचन खरेदी करण्याकरता शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान…. अर्ज कसा करावा जाणून घ्या माहिती….!आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. बहुतेक लोकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी सर्वात मोठा प्रश्न हा पाण्याचा येतो, जर शेतीमध्ये पाणी नसेल तर पीक चांगले येत नाही. यामुळे शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागते. काही भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण होते. या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने तुषार सिंचन योजना देशभरात सुरू केली आहे. यामुळे कमी पाण्यात आपण जास्त उत्पन्न काढू शकतो आणि यासाठी मनुष्यबळ सुध्दा कमी लागते.

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेतून देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात तुषार सिंचनासाठी यंत्रसामग्रीसाठी आर्थिक लाभ दिला जाणार आहे. त्या सर्व योजनांसाठी शेतकऱ्यांना हे अनुदानही दिले जाणार आहे. ज्यामध्ये पाण्याची बचत, कमी मेहनत तसेच खर्चाचीही योग्य बचत होईल. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात तुषार सिंचन करू शकतील.

कृषी तुषार सिंचन योजना 2022 :

देशात अन्नधान्यासाठी शेती ही सर्वात महत्वाची आहे, आणि सिंचन चांगले झाले तरच शेती अधिक चांगली होईल हे तुम्हाला माहीत आहे. शेतात सिंचनासाठी जास्त पाणी लागते. पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही, तर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होईल. या PMKSY 2022 योजने अंतर्गत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे शेतकरी आपल्या शेतात चागले पीक घेणार ज्यामुळे बळीराजा वरचे पाण्याचे संकट निघून जाईल.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा 2026 पर्यत राबवण्यात येत आहे. 15 डिसेंबर 2021 रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 5 वर्षानी 2026 पर्यत वाढवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे एकूण 93,069 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते. या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पत्रकारांना दिली. या योजनेच्या विस्तारामुळे सुमारे 21 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यापैकी 2 लाख अनुसूचित जाती आणि 2 लाख अनुसूचित जमातीचे आहेत.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2022 चे उद्दिष्ट

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची उद्दिष्ट खालील प्रमाणे आहेत. आपल्याला माहित आहे की, पिकाला जर पाण्याचा पुरवठा योग्य रीतीने झाला नाही तर तिकीट खराब होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सर्व शेतकरी कृषीवरच अवलंबून आहेत. परंतु देशातील शेतकऱ्यांची जमीन असणाऱ्यांची समस्या लक्षात घेऊन सरकार नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी आखात असतो. या योजनेद्वारे देशातील प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवणे हे या योजनेची उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री कृषी विचार योजना 2022 च्या माध्यमातून जलस्त्रोतांचा अधिकतम वापर करणाऱ्यांवर अधिक भर देण्यात आला आहे. जेणेकरून त्यानंतरच्या आणि दुष्काळामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांना टाळता येईल आणि असं केल्यामुळे उपलब्ध साधन संपत्तीचा कार्यक्षम वापर सुद्धा होईल त्याचवेळी शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2022 च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे तसेच लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार करणे. प्रधानमंत्री कृषी सिंचन या योजनेअंतर्गत सर्वत्र देशात पाणी उपलब्ध करणे हे मुख्य उद्दिष्ट आहेत.

यामुळे देशातील शेतकऱ्यांना बरीच मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढणार आहे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावणे. एक अधिक पीक पाणी व्यवस्थापन प्रणालीद्वारे व्यवस्थापित केले जाईल. सामाजिक सिंचनासह तांत्रिक कृषी आणि व्यवस्थापन पद्धतीद्वारे संभाव्य जलस्रोतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कमी किमतीचे साधने उपलब्ध करून देणे. तसेच प्रशिक्षण आणि जागवता मोहीम राबवणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.

तुषार सिंचनाचा फायदा :

शेतीतील पिकाला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास पीक खराब होते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, देशातील सर्व शेतकरी कृषीवर अवलंबून आहेत, परंतु देशातील शेतकऱ्यांची जमीन कसणाऱ्यांची समस्या लक्षात घेऊन सरकार नवनवीन पावले उचलत आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

या योजनेद्वारे जलसंचय भूजल विकास इत्यादी पाण्याचे स्रोत सरकारला मिळतील. सोबतच शेतकऱ्याने सिंचनाची साधने खरेदी केल्यास त्यालाही अनुदान दिले जाणार आहे. कृषी तुषार सिंचन योजनेच्या माध्यमातून वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. योजनेच्या माध्यमातून तुषार सिंचन इत्यादीनाही सरकार प्रोत्साहन देणार आहे. शेतकरी कमी पाणी आणि कमी मनुष्यबळमुळे जास्त उत्पन्न घेऊ शकतील.

तुषार कृषी सिंचन योजनेची वैशिष्ट्ये :

या योजनेअंतर्गत जलसंचय भुजल विकास इत्यादी पाण्याचे स्त्रोत सरकारला मिळतील तसेच सर्व शेतात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

शेतकऱ्यांना सिंचनाची साधने खरेदी करण्यास सरकार अनुदान देणार आहे.

पिकांना योग्य प्रकारचे सिंचन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन तुषार सिंचन इत्यादींना सरकार प्रोत्साहन देणार आहे.

या योजनेचा लाभ अशा सर्व शेतकऱ्यांना घेता येईल ज्यांची स्वतःची शेती व पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत.

तसेच जे शेतकरी कटांत्री शेती करत आहेत किंवा सहकारी सभासद आहे, तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

बचत गटांनी देखील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो.

या योजनेअंतर्गत सरकारकडून सिंचन उपकरणे खरेदीवर 80 ते 90% पर्यंत अनुदान दिले जातात.

तुषार सिंचन आर्थिक अनुदान :

तुषार सिंचन योजनेत सहभागी शेतकऱ्यांना 100% अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये 25% रक्कम राज्य शासनाकडून तर 75% रक्कम केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये 100% अनुदान मिळणार आहे. या योजनेचा एकदा लाभ घेतल्यानंतर तुम्ही पुढील 5 वर्ष सरकारी कोणत्याच योजनाचा लाभ घेऊ शकणार नाही.

कृषी तुषार सिंचन योजना 2022 मध्ये अर्ज कसा करावा?

तुषार सिंचन योजनेची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यत पोहोचवण्यासाठी अधिकृत पोर्टल तयार करण्यात आले असून, येथे योजनेशी संबंधित प्रत्येक माहिती सविस्तरपणे सांगण्यात आली आहे. नोंदणी किंवा अर्जासाठी, राज्य सरकारे त्यांच्या संबंधित राज्याच्या कृषी विभागाच्या वेबसाइटवर अर्ज घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या राज्याच्या कृषी विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन अर्जाशी संबंधित माहिती मिळवू शकता…!

सर्वप्रथम तुम्हाला तुषार कृषी सिंचन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट प्लॅनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

या पेजवर तुम्हाला तुमची योजना तुषार सिंचन पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या स्क्रीनवर नवीन पेज उघडेल,
या पेजवर तुम्ही तुषार सिंचन संबंधित माहिती पाहू शकता.

सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डद्वारे नोंदणी करावी लागेल.

नंतर आवश्यक कागदपत्रे आणि आवश्यक ती माहिती भरून तुषार सिंचन योजनेचा ऑनलाईन फ्रॉम भरावा लागेल.

नंतर सर्व कागदपत्रे आणि ऑनलाईन फ्रॉम आपल्या जवळच्या कृषी विभागात जमा करावा.

नंतर कृषी अधिकारी तुषार सिंचन योजतून तुमच्या शेतात तुषार सिंचन पाहायला येणार नंतर तुषार सिंचनचे अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार.

अधिक माहिती किंवा ऑनलाईन आवेदन तुम्ही pmksy.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करू शकता.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment