Shelipalan Anudan Yojana 2022-23 | शेळीपालन अनुदान योजना 2022-23

Shelipalan Anudan Yojana 2022-23 शेळीपालन अनुदान योजना 2022-23 शेळीपालन हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे या व्यवसायाकरिता भांडवल व जागा देखील कमी लागते त्यामुळे कमी भांडवल व कमी जागेमध्ये हा व्यवसाय करता येऊ शकतो शेळ्यांना इतर जनावरांपेक्षा चारा देखील खूप कमी लागतो. एका गायीच्या किंवा म्हशीच्या चाऱ्यामध्ये दहा शेळ्यांचे संगोपन केले जाऊ शकते. त्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय अल्पभूधारक शेतकरी देखील करू शकतात. या व्यवसायामध्ये जर तुम्ही शेळ्यांचे आरोग्य निवारा तसेच तिला लागणारे पिण्याच्या योग्य पाण्याची नियोजन केले तर हा व्यवसाय तुमच्याकरता अतिशय फायदेशीर ठरू शकतो.

मुख्यतः व्यवसाय दोन पद्धतीने केला जातो एक म्हणजे बंदिस्त शेळीपालन व दुसरा म्हणजे अर्धबंदिस्त शेळीपालन. बंदिस्त शेळीपालन म्हणजे शेळ्यांना लागणारा चारा हा त्यांच्या गोठ्यामध्येच पुरवला जातो तर अर्धबंदिस्त शेळीपालनमध्ये शेळ्यांना करण्यासाठी काही वेळ मोकळ्या जागेत सोडल्या जातात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या आढळतात. त्यामध्ये उस्मानाबादी, गावठी, जमनापरी, बारबेरी, अजमेरी या जातीच्या शेळ्या मेंढ्या व बोकडे परप्रांथातून आणून येथे वाटले जातात. तर या पोस्टमध्ये आपण शेळीपालन अनुदान योजना याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

शेळीपालन अनुदान योजना 2022 :

महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी तसेच लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने अनेक योजना खराब होत असतात. त्यातीलच एक योजना म्हणजे शेळीपालन ही आहे. ज्या लोकांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि शेळी पालन करून शेळी फार्म उघडायचे आहे. त्यांच्याकरता महाराष्ट्र शासनाने अत्यंत कमी व्याजदर कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तुम्हालाही या योजने अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर या योजने करता आवश्यक कागदपत्र तसेच पात्रता व अर्जाची प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे.

शेळीपालन व्यवसायाचा सर्वाधिक व्यवसाय हा ग्रामीण भागात चालविला जातो. ग्रामीण भागातील गरीब लोकांची उपजीविका व्यवसाय म्हणून तसेच महाराष्ट्र सरकार यापूर्वीच अनेक पशुसंवर्धन विषय योजनांसाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवते. महाराष्ट्र सरकार या योजनेअंतर्गत लोकांना जे कर्ज पुरवते किंवा उपलब्ध करून देते, त्याला सबसिडी असे देखील म्हटले जाते. ज्यांना शेळीपालनाचे विशेष ज्ञान आहे, त्यांना शेळीपालन योजना 2022-23 अंतर्गत प्राधान्य दिले जाते. या योजनेसाठी कमीत कमी तुमच्याकडे जमीन असायला पाहिजे ज्यामध्ये तुम्ही शंभर शेळ्यांसह पाच बोकड सहज ठेवू शकता.
तर शेळीपालन अनुदान योजना 2022 चे उद्देश आपण खालील प्रमाणे पाहूया.

शेळीपालन अनुदान योजना पात्रता :

शेळीपालन अनुदान योजना विषयक काही पात्रता आहे. ज्या पूर्ण झाल्याशिवाय या योजनेचा लाभ घेता येत नाही.

या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा फक्त महाराष्ट्र राज्यातीलच असला पाहिजे, कमीत कमी जमीन उपलब्ध असावी.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहेत.

या योजनेअंतर्गत ज्यांना शेळीपालन किंवा शेळी व्यवसायाविषयी विशेष ज्ञान आहे, अशा शेतकऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

लाभार्थ्याला शेळीपालनाचा अनुभव असला पाहिजे तरच तो महाराष्ट्र शेळी पालन योजना 2022-23 चा लाभ घेऊ शकतो.

ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन आहे,त्यांचा या योजनेमध्येच समावेश होऊ शकतो.

या योजनेअंतर्गत शेळी फार्म उघडताना लाभार्थ्याला दोन लाख रुपये खर्चून स्वतः लावावे लागतात.

अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

शेळीपालन अनुदान योजना अटी व नियम :

ज्या शेतकऱ्यांना शेळीपालन हा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा शेतकऱ्यांकडे शेळ्या पाळण्यासाठी चांगली जमीन असणे आवश्यक आहे, त्यामध्ये तो 100 शेळ्यांसोबत पाच बोकड ठेवू शकेल.

शेळी पालन व्यवसाय करत असताना शेळ्यांची निगा राखणे व त्यांच्या चाऱ्याची योग्य व्यवस्था करावी.

लाभार्थ्याकडे चारा पिकवण्यासाठी जमिनीची व्यवस्था असावी.

100 शेळ्या व 5 बोकड ठेवण्यासाठी अर्जदाराकडे 9,000 चौरस मीटर जमीन असणे आवश्यक आहे.

अर्जदाराने अर्ज करताना भाडेपावती / एलपीजी/ भाडेपट्टा करार/ 90 हजार चौरस मीटरचा दृश्य नकाशा सादर करणे आवश्यक आहे.

शेळीपालन कर्ज योजनेअंतर्गत शेळी पालन व्यवसाय सुरू करताना तुम्हाला स्वतःहून दोन लाख रुपये स्वतः गुंतावे लागतील.

लाभार्थ्याने एक लाख रुपयापर्यंत कर्ज घेतले असल्यास त्याला एक लाख रुपयेचा धनादेश किंवा पासबुक किंवा एफडी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दस्ताऐवज देणे आवश्यक असते.

अर्जदाराचा शेळी पालन हा प्रकल्प समाजामध्ये शेळीची किंमत घर इत्यादींची माहिती असावी.

शेळीपालन अनुदान योजना 2022-23 चे उद्देश्य :

राज्यातील पशुसंवर्धनाला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट हा शेळीपालनाचा व्यवसाय वाढवण्यासाठी उत्तेजित करणे हा आहे. तसेच राज्यात शेळीपालना व्यतिरिक्त दूध आणि मास उत्पादनात वाढ करणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या व्यवसायाद्वारे बेरोजगार आणि शेळीपालनाची आवड असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज भरून शेळी फार्म उघडू शकतो. तसेच त्यापासून जास्तीत जास्त नफा कमवू शकतो.
राज्यातील ग्रामीण भागांमध्ये अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे कोणताही रोजगार उपलब्ध नाही म्हणजेच ते बेरोजगार आहेत. असे शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात व शेळी पालन योजना 2022 मध्ये अर्ज करून रोजगार मिळवू शकतात. महाराष्ट्रातील रहिवासी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी योजनेअंतर्गत शेतीसाठी शेत अनुदानासाठी कर्ज घेऊ शकतात. तसेच सरकारने आता ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपाची उपलब्ध करून दिली आहे.

शेळीपालन या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :

1) मतदार ओळखपत्र
2) मोबाईल नंबर
3) जमीन दस्ताऐवज
4) पत्त्याचा पुरावा
5) आधार कार्ड
6) वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
7) बँक खाते पासबुक
8) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जात
प्रमाणपत्र
9) निवास प्रमाणपत्र पासपोर्ट
10) पासपोर्ट फोटो
11) ओळखपत्र

शेळीपालन या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा :

सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट
mahamesh.co.in वर जावे लागेल.

या वेबसाईटवर गेल्यानंतर वेबसाईटचे होमपेज उघडेल. तेथे तुम्हाला महामेष योजनेचा पर्याय दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

या वेबसाईटवर क्लिक केल्यावर वेबसाईटचे एक नवीन पृष्ठ उघडेल. तिथे तुम्हाला एकदा लॉगिनचा पर्याय दिसेल.

हा ऑप्शन ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून यामध्ये कॅपच्या कोड टाकावा लागेल.

त्यानंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करा व वेबसाईटचे नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल.

अर्जदारांनी अर्जामध्ये दर्शवलेल्या मुद्द्यांच्या विषयी सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी

त्यानंतर तपशील पूर्ण तपासून पहा व सेव बटनवर क्लिक करा. जे प्रविष्ट केलेली माहिती आहे ती सेव होईल.

त्यानंतर याच अर्जामध्ये योजनेचा उपघटक निवडावा.

अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराचा अर्ज एप्लीकेशन फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केला जाईल. संदेश प्राप्त झाल्यानंतरच निवडीसाठी सबमिट केला जातो.

त्यानंतर तुम्ही पावती पहा बटणावर क्लिक केल्यावर अर्जदाराला अर्जाची पावती दिसेल.

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया :

तुम्हाला जर अर्ज करून घ्यायचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या बँकेकडे जायचे तुम्हाला शेळी पालन योजनेच्या आधारे कर्ज देते.

बँकेत गेल्यानंतर या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँक कर्मचाऱ्यांकडून अर्ज घ्यावा लागतो.

तुम्हाला त्या अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती योग्यरीत्या त्यामध्ये भरावी लागेल आणि त्याच अर्जासोबत तुमची सर्व कागदपत्रे जोडावी लागतील. तसेच त्याचा फॉर्म बँकेत जमा करावा लागतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पशुसंवर्धन विभागाशी देखील संपर्क साधू शकता व तुम्हाला पशुसंवर्धन विभागात जाऊन हा अर्ज द्यावा लागेल.

शेळी पालन कर्ज योजना 2022 महाराष्ट्रासाठी तुम्ही ग्रामपंचायत समितीची देखील संपर्क साधू शकता.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट पण नक्की सांगा इतरांना शेअर करा.

Leave a Comment