Krushi karja Mitra Yojana 2022 | कृषी कर्ज मित्र योजना महाराष्ट्र

Krushi karja Mitra Yojana 2022 कृषी कर्ज मित्र योजना काय आहे? या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कसे कर्ज उपलब्ध होणार….जाणून घ्या त्या विषयी सविस्तर माहिती.  शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पैशांची खूपच गरज असते. जर शेतकऱ्यांकडे पेरणीच्या वेळेस पैसा उपलब्ध नसेल तर त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. जसे शेतीची मशागत, बी-बियाणे, खते, औषधी फवारणी अशावेळी शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने “कृषी कर्ज मित्र योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ इच्छुक व पात्र शेतकऱ्यांना घेता येतो. या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजनेला शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित करण्यात आला आहे. तर चला मग या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहूया.

कृषी कर्जाचे स्वरूप :

शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी त्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त असलेला आपल्याला दिसून येतो साधारणतः शेतकरी हे नवीन पीक कर्ज मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेत असतात. याकरिता सातबाराच्या उताऱ्यापासून ते सर्व बँकांचे ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा त्यांना गोळा करावे लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज तर मिळतच नाही परंतु अधिकचा वेळही त्यांचा खर्च जातो. अशा प्रकारे शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्ज मिळवण्यासाठी अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.
परंतु आता शेतकऱ्यांना अगदी वेळेवर व सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजना तयार करण्यात आली असून, याला ग्रामविकास विभागाने संमती दिली आहे. कर्जमाफीसाठी कर्जाची परतफेड केली जाते आणि नियमितपणे कर्ज सुद्धा त्यांना उपलब्ध करून दिले जाते. परंतु काही शेतकऱ्यांकडे कर्ज उचल असते, त्यामुळे खरीप पिकांसाठी त्यांना कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही व त्यांचे नुकसान होते. मात्र अशा शेतकऱ्यांना सुद्धा कृषी मित्र कर्ज योजना अंतर्गत लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते.

कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्देश :

शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहजतेने उपलब्ध व्हावे तसेच ते मिळवण्यासाठी कोणताही विलंब न व्हावा या उद्देशाने त्याद्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास साधने हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शेतकऱ्यांना भांडवला अभावी शेती करणे खूपच अवघड होते; परंतु पारंपारिक पिकांवर भर देण्यासाठी या योजनेकडून त्यांना सहाय्य केले जाते.

पीक पद्धतींमध्ये शेतकऱ्यांना बदल करणे सहज शक्य होत नाही तसेच बँकेतच वेळेत कर्जही मिळत नाही. शेतकऱ्यांना वेळेत कर्जाचा पुरवठा हा म्हणून हे योजना अमलात आणली आहे.

शेतकऱ्यांना शेती पिकवण्याकरता कर्ज सहज व सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे व त्यांच्या उत्पादनात विकास घडवून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

कृषी कर्ज मित्र योजनेचे महत्त्व :

शेतकरी हे हंगामाच्या तोंडावर म्हणजेच खरीप आणि रब्बी हंगामावर पीक कर्ज घेत असतात हंगामात बदल करून उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. परंतु शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकांची मदत म्हणजे सहाय्य घेण्याची त्यांना गरज असते. ही गोष्ट लक्षात घेऊन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू व पात्र शेतकऱ्यांना ज्या बाबीसाठी कर्ज आवश्यक आहे. अशा प्रकारे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने हे कर्ज त्यांना उपलब्ध करून देण्यात येते, म्हणजेच या योजना चे महत्व आपल्याला दिसून येते. कारण शेतकऱ्यांचा वेळ व अगदी सोप्या पद्धतीने त्यांना या योजनेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिली जाते.

कर्ज मंजूर करण्यासाठी कोणते दर आकारले जातात?

1) अल्पमुदतीचे कर्ज : अल्पमुदतीची कर्ज प्रथमता पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी प्रति प्रकरण सेवा शुल्क रुपये 150/- आकारले जाते.

2) मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज : नवीन काम कर्ज प्रकरण प्रति प्रकरण सेवाशीलकर रुपये 250/-

कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण प्रतिप्रकरण सेवा शुल्क रुपये 200/-

कृषी मित्राचे रजिस्ट्रेशन कसे केले जाते? व त्यांची कार्य :

कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते.

नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्याला कृषी समितीची मान्यता देण्यात येते.

जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतात.

कृषी कर्ज मित्रांनी ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे. त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती द्यावी लागते.

कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज यादी करून मंजुरीसाठी बँकेमध्ये जमा करावी लागते.

कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थाच्या भूमिकेएवजी सहाय्यक व सल्लागाराची भूमिका बजावतो.

कृषी कर्ज मित्रांनी पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना सहाय्य व सल्ला देणे या विषयाचे बंधपत्र त्यांनी आवश्यक असते.

कृषी मित्राला मिळणारा फायदा :

शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे मंजूर केल्यानंतर कृषी मित्राला मानधन स्वरूपात रक्कम देण्यासाठी एक तालुकास्तरीय समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये गटविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रतिनिधी, जिल्हा अग्रणी बँकेचा प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी व पंचायत समिती यांचा समावेश असतो.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment