Kisan Credit Card Scheme 2022 | किसान क्रेडिट कार्ड महिती मराठीत

Kisan Credit Card Scheme 2022 किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 – भारत हा देश कृषीप्रधान देश आहे. येथील बहुतांश लोक आजही मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. देशाच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा 17% ते 18% आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यापैकीच एक योजना म्हणजे “किसान क्रेडिट कार्ड” ही योजना आहे. शेती व्यवसाय हा अनेक घटकांवर अवलंबून असतो, ज्यामध्ये हवामान हा प्रमुख घटक आहे. बऱ्याच वेळा वादळ,पूर, अतिवृष्टी इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढून आपला उदरनिर्वाह भागवावा लागतो.

खाजगी संस्थेकडून उच्च व्याजदराने कर्ज घेऊन त्यानंतर त्यांच्यावर कर्जाचं ओझं वाढू लागते. अशा परिस्थितीत शेतकरी अधिक अडचणींमध्ये फसत जातो. काय करावे त्यांना सुचत नाही. अशा प्रकारच्या अडचणी किंवा संकट दूर करण्यासाठी शासनाने किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू केली आहे. ही योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदर आणि कर्ज मिळण्याची तरतूद आहे. तर चला मग या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

किसान क्रेडिट कार्ड योजना :

किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते त्याद्वारे त्यांना 1 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. या कर्जाच्या माध्यमातून देशातील शेतकरी त्यांच्या शेतीसाठी उत्तम रित्या मशागत करू शकतील यासोबत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा विमा सुद्धा काढता येतो. किसान क्रेडिट कार्ड सोबतच पशुपालक मच्छीमार यांना सुद्धा किसान क्रेडिट कार्ड योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुम्हाला ही किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तेथे ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय 4% दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

ग्रामीण भागातील क्रेडिट कार्ड पुरवठा प्रणालींमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाने किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड डिजिटल करण्याचा विचार केला असून सध्या केंद्र सरकारने मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये किसान क्रेडिट कार्ड डिजिटल करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमधील निवडक जिल्ह्यांमध्ये अनुक्रमांसह लागू केला जाईल. तसेच युनियन बँक ऑफ इंडिया आणि फेडरल बँक योजनेअंतर्गत बँकांच्या विविध प्रकारच्या कार्यपद्धती ऑटोमेशन आणि सेवा प्रधात्यांसह त्यांच्या प्रणालींचे एकत्रीकरण केले जाईल.

किसान क्रेडिट कार्डचे डिजिटायझेशन केल्यामुळे कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी होईल तसेच कर्मचाऱ्यांना होणारा खर्च सुद्धा कमी होईल. तसेच कर्ज मिळवण्यासाठी लागणाऱ्या वेळातही बरीच घट झालेले आपल्याला दिसून येईल. चार आठवड्यांचा हा कालावधी दोन आठवड्यापर्यंत कमी केला जाईल.
तसेच पायलट प्रोजेक्ट म्हणून मिळालेले धडे लक्षात घेऊन किसान क्रेडिट कार्डची डिजिटायझेशनची योजना देशभरात सुरू करण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत किती कर्ज मिळेल?

बरेच शेतकरी असे आहेत की, ज्यांना शेती करण्याची इच्छा आहे पण त्यांच्याकडे शेती योग्य जमीन उपलब्ध नाही या कारणामुळे ते भाड्याने शेती पीक घेण्याचे ठरवितात. परंतु सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून जमिनीवर कर्ज उपलब्ध करून दिली. 1 एकर जमिनीवर कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असणे अनिवार्य आहे.

याद्वारे त्याला 30 हजार रुपये ते 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते. एक एकर जमिनीवर तीस हजार रुपयेपर्यंत आणि दहा एकर जमिनीवर तीन लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते. हे कर्ज मिळवण्यासाठी जमिनीचा नकाशा, जमिनीची प्रत पटवारीची कागदपत्रे, बँक पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे फॉर्म भरू शकता.

आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी हा लाभ घेतला :

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 2.5 कोटी शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला.
8 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र सरकारकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्या मोहिमेनुसार 2.5 कोटी शेतकऱ्यांना 2.62 लाख कोटी रुपयांच्या क्रेडिट मर्यादेसह किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर करस उपलब्ध करून दिले जाते. ही योजना 1998 मध्ये अल्पकालीन औपचारिक क्रेडिट प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. किसान क्रेडिट कार्ड योजना नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अंड रुरल डेव्हलपमेंट (National bank for Agriculture and Rural Development) द्वारे चालवली जाते. तसेच ही योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेची जोडली गेली आहे.

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
1) आधार कार्ड
2) मतदार ओळखपत्र
3) चालक परवाना
4) पासपोर्ट
5) शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे

Kisan credit card किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा :

किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत जावे लागेल. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेमध्ये हा अर्ज करू शकता आणि किसान क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील. नंतरच तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाईल. तसेच तुम्ही बँकांच्या अधिकृत वेबसाईट द्वारे केसीसी साठी अर्ज करू शकता. परंतु हे कार्ड तुम्हाला मिळवण्यासाठी तुमचं पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खात असणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment