Information About Shivneri Fort | शिवनेरी किल्ल्याची माहिती |

Information About Shivneri Fort | शिवनेरी किल्ल्याची माहिती |

नमस्कार मित्रांनो आज आपण शिवनेरी किल्ल्याची माहिती पाहणार आहोत आपण सर्वांना माहितीच आहे की शिवनेरी किल्ला हा काय आहे तरीसुद्धा आज आपण याची माहिती डिटेल मध्ये पाहूया आपण सर्वांनाच माहिती आहे की शिवनेरी किल्ला हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे तर मित्रांनो आपण शिवनेरी किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास हा आपल्या लेखांमधून पाहणार आहोत शहाजी महाराजांच्या पत्नी म्हणजेच जिजाबाई या गरोदर असताना त्यांच्या सुरक्षेतेसाठी जिजामातांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यामुळेच हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे शिवनेरी किल्ला हा जुन्नर परिसरातील असून इतर डोंगरी किल्ल्यापेक्षा हा सर्वात मोठा आहे जुन्नर मधून शिवनेरी किल्ला परंतु त्याच्या वाटेवरून किल्ल्याचा तट आणि किल्ल्यातील पूर्वेकडील बौद्ध लेणी इत्यादीचे दर्शन आपल्याला होते जुन्नर परिसरातील या डोंगरी किल्ल्यांपैकी शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये व तसेच इतिहास अभ्यासक्रमात सुद्धा परिचित आहे व तसेच शिवनेरी किल्ल्यावर श्री शिवाजी देवी जुन्नर परिसरातील आदिवासी कोळी बांधवांची कुलदेवता आहे व त्याच शिवाई देवीच्या नावावरून त्या किल्ल्याला शिवनेरी नाव पडले.अशी लोककथा जुन्नर परिसरात रूट झालेली आहे. शिवनेरी किल्ल्याचे वर्णन हे जुन्नर गड किंवा जुन्नर चा किल्ला असाही केला जातो चला तर मित्रांनो पाहूया शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती.

मित्रांनो शिवनेरी किल्ला हा यादव काळापासून सुरू आहे परंतु असे असताना सुद्धा हे सर्वच किल्ले एकाच राजवंशाच्या कालावधीत बांधलेले होते असे नाही सातवाहन कालखंडामध्ये बौद्ध लेणी शिलाहार राजवटीमध्ये तटबंदी यादव कालखंडात काही ठिकाणची तटबंदी बुरुज व प्रवेशद्वारांची बांधकामे झालेली आहेत तसेच किल्ल्यावरील अंबर खाण्याची इमारत बहामांनी राजवटीमध्ये मालिक उल तुजारने बांधलेली आहे व त्याचबरोबर किल्ल्यावरील इतरही इमारतीचे बांधकाम करण्याचे उल्लेख आहेत.

सातवाहन काळात शिवनेरी किल्ला प्रसिद्धीस आलेला नसला तरी शिवनेरीच्या कडेकपारीमध्ये सातवाहनांनी बौद्ध भिकूंच्या वास्तव्यासाठी लेणी कोरवली मित्रांनो डोंगररांगांनी वेढलेल्या उंच टेकड्यावर असणाऱ्या शिवनेरी किल्ल्याचा सातवाहन अभीरसिंध शिलाहार यादव बहमनी अहमदनगरची निजामाबाद ची मुघल मराठी आणि इंग्रज इत्यादी राजवटी शी संबंध आलेला आहे हा किल्ला यादव काळात सुरू झालेला असून यादव कालखंड ते पेशवे काळापर्यंत विविध राजवटींच्या स्थापत्यशास्त्रांची विविध किल्ल्याच्या बांधकामामध्ये आहे व तसेच या किल्ल्यावर जाण्यासाठी सात दरवाजे आहेत परंतु त्यासाठी दरवाजांचे बांधकाम एकसारखेपणाने केलेले नाही चला तर मित्रांनो पाहूया कोणते आहेत ते सात दरवाजे.

सात दरवाजे

  1. महादरवाजा
  2. परवानगी दरवाजा
  3. हत्ती दरवाजा
  4. पीर दरवाजा
  5. शिवाबाई दरवाजा
  6. फाटक दरवाजा
  7. कूलापकर दरवाजा

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास

या किल्ल्यांवर जाण्यासाठी आपल्याला तीन मार्ग दिलेले आहेत पहिला मार्ग हा किल्लाच्या दक्षिणेकडून कुसूर गावाजवळून जाणारा मोठा शासकीय मार्ग असून या मार्गाने आपण आपले स्वतःचे वाहन किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या पर्यंत आपल्याला नेऊ शकतो. मात्र तेथून किल्ल्याच्या दरवाजा मधून पायी चालून गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थान व बालेकिल्ला या ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचता येते.

शिवनेरी किल्ल्यावर चढून जाण्यासाठी दुसरा मार्ग हा चोरवाट आहे या किल्ल्याच्या बालेकिल्ल्यापासून या मार्गाने बौद्ध लेणी जवळून दगडी पायऱ्या व साखर दंडीच्या साह्याने चढ उताराची वाट आहे मात्र ही जी वाट आहे ती अत्यंत धोकादायक असल्याने तिचा वापर शक्यतोवर कोणी करत नाही.

शिवनेरी किल्ल्यावर जाणारे तिसरी वाट ही किल्ल्याच्या पश्चिम बाजूस आहे परंतु ही वाट सध्या वापरात नाही मित्रांनो या किल्ल्यावर काही प्रसिद्ध ठिकाणी सुद्धा आहेत जे आपल्याला पाहायला मिळतील चला तर पाहूया कोणती आहे ते ठिकाण.

मित्रांनो सर्वात आधी किल्ल्यावर गेल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान पहायला मिळते व तसेच किल्ल्याच्या दक्षिण टोकाला छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचा एक पुतळा आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्या किल्ल्यावर शिवाय देवीचे मंदिर आहे त्या गडाच्या उत्तर दिशेला बदामी तलाव आहे मित्रांनो हा तलाव बदामी आकाराचा असल्यामुळे याचे नाव बदामी तलाव असे पडले आहे व तसेच गडावर विविध प्रकारच्या बौद्ध लेणी सुद्धा आहे.

किल्ल्याच्या गडावर गंगा व यमुना नावाच्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत व तसेच मुघल काळातील एक मशिद आपल्याला गडावर पाहायला मिळेल आणि त्या गडावर आपल्याला तानाजी मालुसरे उद्यान पाहायला मिळेल जे गडाच्या डाव्या बाजूला आहे व गळाचे सर्व दरवाजे पार केल्यानंतर आपल्याला अंबरखाना लागतो या आंबर खाण्याचा वापर पूर्वी धान्य ठेवण्यासाठी केला जायचा ज्याला आपण कणगी सुद्धा म्हणतो बदामी तलावाच्या पुढे गेल्यानंतर कडेलोट टोक आहे याकडे लोट टोकांची उंची जवळपास पंधराशे फूट आहे व तसेच पूर्वी गुन्हेगारांना शिक्षा म्हणून कडेलोट केला जायचा या कडेलोट टोकावरून गुन्हेगाराला केले जायचे तर मित्रांनो ही प्रसिद्ध ठिकाणे आपल्याला शिवनेरी किल्ल्यावर पाहायला मिळतील.

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

Leave a Comment