How to watch 7/12 after 1880 on mobile? | १८८० वर्षी नंतरचे सातबारा उतारे मोबाईल वर कसे पाहावे ?

१८८० वर्षी नंतरचे सातबारा उतारे मोबाईल वर कसे पाहावे ?

नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे आता तुम्हाला सातबारा हा मोबाईल वर बघता येणार आहे. वर्ष 1880 नंतरचा सातबारा आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती बघता येणार आहे आज आपण यावरच माहिती पाहणार आहोत चला तर मग पुढे पाहूया.

मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी शेती ही खूप महत्त्वाची आहे आणि याच्याच माध्यमातून सातबारा हा खूप महत्त्वाचा असतो. सातबारा काढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते आणि विविध ठिकाणी फिराही लागते , मात्र आता तुमचे काम हे सोपे होणार आहे आणि हाच सातबारा तुमच्या मोबाईल वरती सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे , कारण आता अशी सुविधा उपलब्ध झालेली आहे .

शेती विषयी कोणतेही काम असो अथवा कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सातबारा हा मुख्य कागद आहे ज्याने शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या सर्व योजना आणि विविध कामे करू शकतो. चला तर मित्रांनो पुढे पाहूया हा सातबारा आपण आपल्या मोबाईल वरती कसा पाहू शकतो.

सातबारा कसा मिळवायचा ?

शेतीसाठी सातबारा खूप महत्त्वाचा असतो . सातबारा मध्ये शेती विषयी सर्व माहिती संघटीत असते आणि याच्याच माध्यमातून आपण शेती न पाहता शेती विषयी सर्व माहिती आपल्याला कळते , सातबारा मार्फत आपल्याला गावाचे नाव , जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे ? , जमीन आधी कोणाच्या नावावर होती ? , आता जमिनीचे मालक कोण आहेत ? , अशा प्रकारचे सर्व माहिती कळते.

यादी आपल्याला जर सातबारा हवा असेल तर तलाठी कार्यालयामध्ये जावं लागत होतं किंवा तहसील कार्यालयामध्ये जावं लागत होतं पण आता मात्र तुम्ही डिजिटल स्वरूपामध्ये तुमच्या जमिनीचा सातबारा हा मोबाईल वरती बघू शकता.

चला तर पाहूया डिजिटल सातबारा आपण कशाप्रकारे पाहू शकतो ?

मित्रांनो यासाठी आपल्याला ब्राउझर वर जावे लागणार आहे , आणि तेथे पुढील नाव सर्च करावे लागणार आहे महाभुलेख असे नाव तेथे सर्च करा.
mahabhulekh

मित्रांनो जी वेबसाईट तुमच्यासमोर पहिल्या नंबर वर येईल त्यावर तुम्हाला जायचे आहे.

यानंतर बिना स्वाक्षरी सातबारा यावर क्लिक करावे लागणार आहे.

यानंतर आपल्याला विभाग निवडण्यासाठी सांगितले जाईल तेथे आपण आपला विभाग निवडावा.

यानंतर गो या बटनावर क्लिक करावे.

विविध पर्याय तुम्हाला दिसतील तर त्यामधील सातबारा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला जिल्हा निवडाण्यास सांगितले जाईल तर आपला जिल्हा निवडावा. यानंतर आपला तालुका निवडावा त्यानंतर आपले गाव निवडावे.

यानंतर आपला सर्वे नंबर हा तिथे टाकावा लागणार आहे . तिथे आपले नाव मधले नाव आणि आडनाव हे टाकावे लागणार आहे.

त्यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जाईल त्यावर क्लिक करा Allow या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर सातबारा पहा असा पर्याय तुमच्या समोर येईल त्यावर क्लिक करा तेथे एक कॅपच्या कोड दिला जाईल तो तसाच खाली लिहा.

मित्रांनो यानंतर पुढील पेजवर तुम्हाला तुमचा सातबारा दिसणार आहे.

अशा पद्धतीने आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल वरती तुमच्या शेतीचा डिजिटल सातबारा पाहू शकता आणि हा तुम्ही दुसऱ्यांना पाठवू पण शकता. अशा पद्धतीने तुम्ही सर्व कामे करू शकता. हा सातबारा तुम्ही प्रिंट पण काढू शकता. धन्यवाद !

Leave a Comment