Grapanchayat Nidhi | ग्रामपंचायत निधी महिती

Grapanchayat Nidhi सरकारने गावातील ग्रामपंचायतीसाठी किती निधी दिला? तो निधी कुठे खर्च केला? हे कसं पाहायचं तर जाणून घ्या त्यासाठी खालील माहिती….!
आपल्या गावातील ग्रामपंचायतीचा विकास केला किंवा नाही तसेच मिळालेल्या निधी कुठे जातो असे अनेक प्रश्न व शंका आपल्या गावकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत असतात. बऱ्याच वेळा ग्रामपंचायतच्या सदस्यांवर देखील आरोप केले जातात. परंतु ग्रामपंचायतीने जर खरंच विकास केला असेल किंवा नीधी खर्च केला असेल तर या सर्वांची माहिती आपण घरबसल्या जाणून घेऊ शकतो. तर चला मग याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया…

ग्रामपंचायत निधीविषयी माहिती कशी जाणून घ्यावी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिन 24 एप्रिल 2020 रोजी ‘ई ग्राम स्वराज’ या मोबाईल ॲप्लिकेशन लोकार्पण केलेला आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, या ॲपवर ग्रामपंचायतच्या विकासाची सविस्तर माहिती सर्वांना मिळेल. ग्रामपंचायतीसाठी दिलेला निधी कोठे खर्च झाला? तसेच एकूण किती निधी आला? गावाचा कोणताही नागरिक आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू आहे. ही सर्व माहिती आपल्या मोबाईलवरच पाहू शकतो.

सर्वप्रथम गावाचे बजेट कसं ठरतं ते पाहूया.

दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये ग्रामविकास समितीची एक बैठक बोलावली जाते. त्यामध्ये गावाचे आरोग्य, महिला कल्याण, शिक्षण व अशा वेगवेगळ्या गरजांच्या मुद्द्यांवर विचार केला जातो. त्यानंतर ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे किती निधी उपलब्ध आहे आणि सरकारकडून किती निधी उपलब्ध होईल, यासंबंधीचा एक अंदाजपत्रक तयार केला जाते. हे अंदाजपत्रक गावातल्या सगळ्या योजनांचा असून 31 डिसेंबर पूर्वी पंचायत समितीला पाठवणं आवश्यक असते व अंदाजपत्रक पंचायत समिती राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवत असते.
एका गावाकरता केंद्र व राज्य सरकार तसेच इतर अशा जवळपास 1140 योजना असतात. आता कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची व ते गाव कोणत्या जिल्ह्यात येते. हे भौगोलिक क्षेत्रानुसार ठरविण्यात येतो.

जर गावाविषयी राबवण्यात येणारी योजना जर राज्य सरकारची असेल तर 100% निधी राज्य सरकार देते आणि केंद्राच्या बहुतांश योजनेसाठी 60% केंद्र सरकार तर 40% राज्य सरकार निधी देत असते.
1 एप्रिल 2020 पासून पंधरावा वित्त आयोग सुरू झाला असून त्यानुसार सरकार गावातल्या प्रति मानसी प्रतिवर्षी सरकार 957 रुपये देत आहे चौदाव्या वित्त आयोगासाठी ही रक्कम 488 रुपये होती.

14 व्या वित्त आयोगानुसार निधी गावासाठी दिला होता. त्यातला 25% मानव विकास, 25% कौशल्य विकास, 25% केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा समन्वय व 25% पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात आला होता. तर 15 व्या वित्त आयोगानुसार गावाला मिळालेल्या एकूण निधी पैकी 50% निधी पाणीपुरवठा, स्वच्छता या बाबींवर खर्च करण्यात आला व 50% इतर बाबींवर खर्च करण्यात आला असे सांगितले गेले.

तुमच्या गावासाठी सरकारकडून किती नीती आला व ग्रामपंचायतीने तो निधी कुठे खर्च केला हे कसे पहावे?

ग्रामपंचायतीने आलेला निधी कुठे खर्च केला ही सर्व माहिती पाहण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वरून ई ग्राम स्वराज या नावाचे ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. ॲप ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये सर्वप्रथम स्टेटमध्ये तुमचं राज्य त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये तुमचा जिल्हा ब्लॉक पंचायतींमध्ये तालुका व्हिलेज पंचायतीमध्ये गावाचं नाव निवडून माहिती भरून घ्यायची आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे.

गावाच्या नावासमोर गावाचा कोड क्रमांक ही दिसेल त्या खालील तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठीची माहिती पाहिजे आहे. ते वर्ष निवडायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर तीन वेगवेगळे पर्याय येतील. त्यातील सगळ्यात पहिला पर्याय ER डिटेल्स असतो. यामध्ये ER म्हणजे Elected Representative म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती असते. या पर्यायावर क्लिक केले की तुम्हाला गावातील सरपंच सचिव व ग्रामपंचायत सदस्यांची सविस्तर माहिती मिळते.

त्यामध्ये त्यांची नाव, वय, पद व जन्मतारीख अशी माहिती असते. हे ॲप नुकतीच लॉन्च करण्यात आल्यामुळे यामध्ये माहिती भरण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. त्यामुळे सगळ्याच गावांमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींची नावे यामध्ये तुम्हाला दिसतीलच असे नाही; परंतु असे असले तरी सुद्धा गावाचे विकासासाठी सरकारने किती पैसा दिला व त्यातील किती पैसा ग्रामपंचायतीने खर्च केला हे मात्र तुम्ही नक्की पाहू शकता.

त्यानंतर दुसरा पर्याय असतो Approved Activities. यामध्ये ग्रामपंचायतला कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर करायला आहे. ते सांगितलेले असते. त्यानंतर तिसरा पर्याय असतो, तो म्हणजे फायनान्शिअल प्रोग्रेस Financial Progress. यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते.  फायनान्शिअल प्रोग्रेस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. यामध्ये आपण जे आर्थिक वर्ष निवडले असेल ती सुरुवातीला तिथे दिसेल, त्यानंतर गावाचा कोड, नाव व त्यानंतर आर्थिक वर्षात तुमच्या गावासाठी किती निधी आला आहे, त्याची रिसिप्ट तुमच्यासमोर दिसेल. त्यापैकी किती निधी खर्च झाला आहे. रक्कम expenditure या पर्याय समोर दिसेल. त्याखाली लिस्ट ऑफ स्किम हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचायतीला जो एकूण निधी मिळाला असतो, त्याची विभागणी केलेली असते व यामध्ये कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला व किती निधी खर्च झाला याची सर्व माहिती असते.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment