E- Pik pahani new version 2.0 | ई पिक पाहणी ॲप

E- Pik pahani new version 2.0

ई-पीक पाहणी ॲप न्यू वर्जन – 2.0 या ॲपच्या माध्यमातून सातबारावर नोंदणी करू शकता…!

शेतकऱ्यांकरिता ई पीक पाहणीच्या माध्यमातून शासनाकडे थेट पेरा नोंदविला जाणार आहे. याच अनुषंगाने कोणत्याही पिकाचे किती क्षेत्रावर उत्पादन घेतले आहे तसेच नुकसान भरपाईसाठी कोण पात्र आहेत. राज्यात पीक पेरा किती आहे याची देखील सरकारला माहिती मिळते. ई-पीक पाहणी ही प्रणाली शेतकऱ्यांकरिता नवीन आहे. तरी सुद्धा या माध्यमातून राज्यात सर्वाधिक पिकांच्या नोंदी शेतकऱ्यांनी केलेला आहेत. तर चला मग ई पीक पाहणी मोबाईल ॲप विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ई पीक पाहणी ॲप 2 :

खरीप हंगाम 2022 चे पीक पाहणी प्रक्रिया सुरू झाली असून ई पीक पाहणी आता मोबाईल ॲप द्वारे शक्य झालेले आहे. मोबाईल ॲपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाईल ॲप वर्जन 2 विकसित करण्यात आले आहे. हे सुधारित ई पीक पाहणी मोबाईल ॲप वर्जन 2 आपण आपल्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकतो. शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून मोबाईलद्वारे आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे. ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी हे पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाची तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी तलाठ्यांना ई पीक पाहणीचे प्रशिक्षण देऊन सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पहाण्याची ॲप डाऊनलोड करून मोबाईलद्वारे आपल्या पिकांची नोंद करावी. या ॲपमध्ये पिकाची नोंद करण्यासाठी त्यांनी 15 ऑक्टोबर 2022 ही शेवटची तारीख दिली होती.

ई पीक पाहणी ॲपचा उद्देश :

ई -पिक पाहणी या ॲपचा उद्देश व शेतकऱ्याच्या पिकाची अचूक नोंद शासनाला मिळावे. या उद्देशाने या ॲपची निर्मिती झाली आहे. ई पिक पाहणी ॲप मध्ये यावर्षी बदल करण्यात आलेला आहे मोबाईल ॲप मध्ये हा बदल करण्यात आला असला तरी शेतकऱ्यांसाठी सोपी आणि त्यांच्या सहज लक्षात येईल अशी ही ॲप आहे.

ई पिक पाहणी ॲप 2 लॉन्च :

जुन्या ई पीक ॲपमध्ये बऱ्याच समस्या येत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ई – पीक पाहणी ॲप 2 ही लॉन्च करण्यात आली. ही ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोपी व सहज लक्षात येते त्यामुळे शेतकऱ्यांना या ॲपवरून माहिती शासनापर्यंत पोहोचण्यास कोणत्याही अडचणी येत नाहीत. 1 ऑगस्ट पासून या प्रक्रियेला राज्यभर सुरुवात झाली असून यापूर्वी महसूल विभागाच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम आता शेतकरीच करत आहेत. त्यामुळे हे तत्परता आणि पीक पिऱ्याचे महत्व शेतकऱ्याच्या लक्षात येऊ लागले. यावर्षी तर पिक विमा योजनेसाठी शासकीय विमा कंपन्यांचाच समावेश करण्यात आलेला होता. त्यामुळे नुकसान भरपाई दरम्यान याच पीक पाहणीनुसार भरपाई देण्याचा निर्णय झाला तरीही नोंद प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाची राहणार असून सध्या शेतात ई – पीक पाहणी करायची लगबग सुरू आहे.

ई-पीक पाहणी अँपचे महत्व :

ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून ती शासनासाठी देखील महत्त्वाची आहे. या ॲपद्वारे थेट शासनाकडेच शेतकरी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून शेतातील पेरा सातबारावर नोंदणी करू शकतो.

ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कोणत्या क्षेत्रात कशाची पिक घेतले आहे तसेच नुकसान भरपाईसाठी हे शेतकरी पात्र आहे किंवा नाही याचा महत्त्वाचा फायदा आहे.

मागील वर्षात देखील खरीप हंगामात ई पीक पाहणी प्रणाली शेतकऱ्यांसमोर नवीन असली तरीही या मार्फत शेतकऱ्यांनी राज्यात सर्वाधिक पिकांच्या नोंदणी केल्या होत्या. याच यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई च्या दरम्यान मदत मिळाली.

ई -पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया थोडक्यात जाणून घेऊया :

नोंदणी प्रक्रियेसाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणी अँपमध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी लागेल.

सातबारा मधील नावाप्रमाणे खातेदारांना त्यांच्या नावाची अचूकपणे नोंद करावी लागणार आहे.

ई पिक पाहणी ॲप वर नोंद कशी करायची याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया :

ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एकापेक्षा जास्त खाते क्रमांक आहेत. त्यांनी त्यांची नाव नोंदणी केल्यास त्या गावातील सर्व खाते क्रमांक व सर्व भूमापन किंवा गट क्रमांक मोबाईलवर दिसतील.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीसाठी मोबाईलवर एसएमएस द्वारे चार अंकी पासवर्ड येईल.

हा पासवर्ड अचूकपणे भरल्यास खातेदाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसेल.

यानंतर खातेदाराला हा सांकेतिक पासवर्ड टाकून पीक पाहनी अँमध्ये लॉगिन करावे लागेल व पिक आवश्यक माहिती भरावी लागेल.

ई -पिक पाहणी विषयी मार्गदर्शक सूचना :

शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदणी करत असताना काही मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. जसे खातेदारांच्या नोंदणी करताना त्यांची खाते क्रमांक किंवा गट क्रमांक यांची माहितीसाठी सातबारा उतारा किंवा उतारा आठ अ ची प्रत आवश्यक राहील.

सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्यांचे नाव, गाव नंबर, सातबारा यामध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदवले गेले आहे. ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकाची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतात.

पिक पाहणी अंतर्गत केलेल्या पिक विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदविले गेलेले पीक यामध्ये फरक आढळल्यास ई पीक पहाणीमध्ये नोंदवलेली पिकच अंतिम गृहीत धरण्यात येईल.

अल्पवयीन खातेदारांच्या बाबतीत त्यांचे पालक या ॲपवर नोंदणी करू शकतील खातेदाराने पीक पाहण्याची माहिती स्वतः शेतामध्ये उभी राहून भरावी लागेल. पीक पाणी झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांश सह फोटो व सर्व माहिती अपलोड करावी लागेल.

ही माहिती अपलोड करत असताना जर इंटरनेट विषयी अडचणी निर्माण होत, असतील तर ज्या भागांमध्ये एक इंटरनेट कनेक्शन आहे. त्या भागामध्ये जाऊन तुम्ही ती माहिती अपलोड करू शकता.

नोंदणी केलेल्या मोबाईलवर पासवर्ड आला की, हा पासवर्ड कायमस्वरूपी वैद्य असेल आणि तो भविष्यात सुद्धा तुम्हाला वापरता येईल.

जर एखाद्या शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नसेल तर तो त्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या मोबाईल वरून आपली स्वतःची नोंदणी करू शकतो व एका मोबाईलवर नंबर वरून वीस खातेदारांची नोंदणी करता येऊ शकते.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment