Ativrushti Anudan Yojana 2022 Maharashtra district list | अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022

Ativrushti anudan Yojana 2022 Maharashtra district list – अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 या जिल्ह्यांना पाठवले पैसे जाणून घ्या. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते. जसे अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर व नैसर्गिक आपत्ती परंतु शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. याकरता राज्य सरकार किंवा केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवत असते. या योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या योजनेच्या योजनांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक सरकारी कर्मचारी कार्यरत असतात. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात मदत मिळते व त्यांना दिलासा मिळतो. तर आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई यादी व कोणत्या जिल्ह्यांना किती नुकसान भरपाई झाली याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2022 या वर्षांमध्ये संपूर्ण राज्यात जून ते ऑगस्ट या महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.
या नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यांमध्ये विविध विभागांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे आपण या पोस्टमध्ये जिल्हा निहाय नुकसान भरपाईचा किती निधी मिळणार याची यादी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. तर चला मग याविषयी संपूर्ण माहिती पाहूया.

महाराष्ट्र राज्यांमध्ये जून ते ऑक्टोबर या महिन्यात पूरस्थिती निर्माण झालेली होती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता भरपाई मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 3,345 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र राज्यातील सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे. तसेच हा निधी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचल्यामुळे शेतकरी बांधवांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

कोणत्या विभागासाठी किती निधी मिळणार ?

शासनामार्फत महाराष्ट्रातील विविध विभागाला खालील प्रमाणे निधी वितरित केला जाईल.

त्यामध्ये औरंगाबाद विभागाला 1008 कोटी रुपये तर अमरावती विभागाला 1196 कोटी रुपये निधी वितरित केला जाईल तर नागपूर विभागाला 1196 कोटी एवढा निधी वितरित केला जाणार असून पुणे विभागाला 44 कोटी 38 लाख एवढा निधी वितरित केला जाईल तर नाशिक विभागाला 36 कोटी 95 रुपये लाख निधी वितरित केला जाईल. तसेच कोकण विभागाला 2.64 कोटी रुपये एवढा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणून मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होईल व त्यांचे जीवन सुरळीत चालण्यास मदत होईल. या नितीन मी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल व आपल्या जीवनात ते हताश होण्यापासून वाचतील.

कारण जून ते ऑक्टोबर 2022 या काळामध्ये झालेल्या नुकसान हे शेतकऱ्यांना असह्य झाले होते. म्हणून शासनाने नुकसान भरपाईसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जिराईत जमिनी किंवा पिकांसाठी
13,600 रुपये निधी मंजूर केला तर बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 36 हजार रुपये निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ही मदत मिळणार असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे. मागील काही दिवसांमध्ये अति पाऊस पडला या अति पावसाने अतिवृष्टीचे स्वरूप निर्माण झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

मात्र या अतिवृष्टीची पाहणी राज्याचे कृषिमंत्री सत्तार साहेब यांनी केले व या सर्व नुकसानीची भरपाई किंवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून लवकरात लवकर दिल्या जाईल असे सुद्धा त्यांनी सांगितले होते.

अतिवृष्टी नुकसान भरपाई विभागानुसार मिळालेल्या निधी :

अमरावती विभाग : मंजूर निधी हा 1196 कोटी रुपये आहे.

नागपूर विभाग : मंजूर निधी हा 1156 कोटी रुपये आहे.

औरंगाबाद विभाग : मंजूर निधी हा 1008 कोटी रुपये.

नाशिक विभाग : मंजूर निधी हा 36 कोटी 95 लाख रुपये.

पुणे विभाग : मंजूर निधी हा 44 कोटी 38 लाख रुपये

कोकण विभाग : मंजूर निधी हा 2.64 कोटी रुपये

हा निधी वितरित करण्याची दिनांक 8/9/2022 ते 14/9/2022 व 28/9/2022 असून शासन मान्यता देण्यात आली आहे.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment