ASHA Workers Information in Marathi | आशा स्वयंसेविका महिती मराठीमध्ये

ASHA Workers information in Marathi language.आशा स्वयंसेवक मराठी माहिती – ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा या मध्यस्ताचे काम करत असतात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत क्रमस्तरावर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आशा या स्वयंसेविकांची नेमणूक केली जाते. ग्रामीण भागांमध्ये 1500 लोकसंख्येमागे एक आशा तर आदिवासी भागांमध्ये एक हजार लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविकाची नियुक्ती केली जाते. ग्रामीण भागातील तसेच आदिवासी भागातील लोकांना स्वच्छता लसीकरण यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, हगवण, लहान मोठ्या आजार यावरील प्राथमिक स्वरूपाची उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते.

याव्यतिरिक्त ग्रामीण भागांमध्ये त्यांना DOTS, Folic Acid आणि Chloroquin यांसारख्या टॅबलेटचे वाटप करण्याचे सुद्धा काम आशा यांच्यामार्फत केली जाते. याव्यतिरिक्त आरोग्य विषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारी ASHA आशावर असते. याचा मोबदला म्हणून त्यांना दरमहा वेतन तसेच भत्ता दिला जातो. जाणून घेऊया आशा वर्कर्स विषयी सविस्तर माहिती.

आशा स्वयंसेविका :

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत आशा ह्या गावातील स्थानिक असतात तसेच आशा स्वयंसेवकांकडून गावातील आरोग्य विषयक विविध समस्यांची माहिती समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेतृत्व करणे अपेक्षित असते. तसेच ग्रामीण महिलांना बाळंतपण, सुखरूप प्रस्तुती, स्तनपान, लसीकरण, गर्भ प्रतिबंधक उपाययोजना, जनेंद्रियांशी संबंधित जंतुसंसर्ग, लैंगिक संबंधातून होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकांची काळजी घेणे इत्यादी आरोग्य विषय संबंधित माहिती व मार्गदर्शन करण्याचे काम आशा यांच्यावर असते.

अशा स्वयंसेविकांच्या जबाबदाऱ्या :

आशा स्वयंसेविका प्रत्यक्ष गावामध्ये फिरवून साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करत असतात. तसेच कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे माता आणि बाल आरोग्य विषयी प्रबोधन करणे, जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषध देणे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात.

आशा स्वयंसेविकांच्या भूमिका :

आशा स्वयंसेविकांचा संपर्क सतत ग्रामीण जनतेशी होत असतो त्यामुळे ग्रामीण भागातील समस्यांचे निवारण करण्यासाठी त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. जसे कोरोना साथी मध्ये घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींना काही त्रास आहे का? वयोवृद्ध लोक कोणत्या घरात राहतात? त्यांना कोणते आजार आहेत का? याचं घरोघरी जाऊन त्यांनी सर्वेक्षण केलं. होम कॉरंटाईन असलेला कोरोना रुग्णाला कोणती लक्षणे दिसतात का? याविषयीची सर्व माहिती दररोज घेणे व आरोग्य केंद्रावर लोकांना तपासणीसाठी आणणे, लसीकरणासाठी जनजागृती करणे, लसीकरण केंद्रावर मदतीचे काम करणे
ही सर्व महत्त्वाची भूमिका आशा स्वयंसेवकांनी कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये केली. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशांवर सोपवण्यात आली आहे.

राज्यात किती आशा स्वयंसेवक आहेत?

राज्यामध्ये साधारणतः 70000 अशा स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आदिवासी जिल्ह्यांमध्ये 1000 लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेवक नियुक्त असून गैर आदिवासी जिल्ह्यांमध्ये 1500 लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेवक नियुक्त आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये 9,523 अशा स्वयंसेवक आरोग्य सेवा देत असून बिगर आदिवासी जिल्ह्यांमध्ये 50,000 हून अधिक आशा स्वयंसेविका काम करत आहेत. अशा स्वयंसेवकांची ही कामगिरी खूप मोलाची आहे.

आशा स्वयंसेविकेचे शिक्षण व प्रशिक्षण :

आशा स्वयंसेविकेचे शिक्षण व प्रशिक्षण हे महत्त्वाचे घटक असून आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांची शिक्षण हे आठवी पूर्ण झालेले असावे. त्याचबरोबर बिगर आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचे शिक्षण हे दहावी पूर्ण झालेली असावे, अशी शासनाची अट आहे. तसेच आशा स्वयंसेवी काही विवाहित स्त्री असावी त्याचबरोबर ती वीस ते पंचेचाळीस वयोगटातील असावी. या वर्गातील ज्या उमेदवारांकडून अर्ज केले जातात. त्यातून तीन उमेदवारांचे नावही ग्राम सभेला सुचित करण्यात येतात आणि ग्रामसभेकडून या तीन उमेदवारापैकी एका आशा स्वयंसेविकेची निवड केली जाते. ग्रामसभेद्वारे आशा स्वयंसेविकेची निवड
झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी त्यांच्याकडून अशा स्वयंसेविकाला नियुक्ती पत्र देण्यात येते. त्यानंतर अशा स्वयंसेविकांना 23 दिवसाचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते.

आशा स्वयंसेविकांच्या मागण्या :

महाराष्ट्र राज्य आशा कृती समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांच्याकडून अशी माहिती मिळाली की, आशा स्वयंसेविकांना आरोग्य यंत्रणेची निगडित 72 कामे करावी लागतात. त्या बदल्यात त्यांना ₹2000 ते ₹3000 मोबदला सुद्धा देण्यात येतो. परंतु कोरोना सारख्या काळात इतर 72 कामे करता येणे शक्य नाही. त्यामुळे अधिकचा मोबदला त्यांना मिळणे बंद झाला आहे. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेले प्रोत्साहन भत्ता महिन्याचे हजार रुपयांवर काम करावे लागत आहे.

आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी सुद्धा त्यांची मागणी होती. कोरोना काळात जोखीमच काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांनी एवढा दर्जा देण्यात यावा. तसेच त्यांना दरमहा 18 हजार रुपये एवढे मानधन देण्यात यावे. अशी त्यांची मागणी आहे. तर अशा प्रकारे ग्रामीण भागातील जनता व शासन यांच्यामधील मध्यस्थींची काम पूर्ण करून एका जनजागृती करण्याचे काम आशा स्वयंसेविका करत असतात.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment