Application for fruit crop insurance 2023 starts | फळपीक विमा 2023 साठी अर्ज सुरू

फळपीक विमा 2023 साठी अर्ज सुरू

नमस्कार मित्रांनो आज आपण एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो ही योजना सर्वच शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची आहे. जे शेतकरी मित्र फळबाग शेती करतात त्यांच्यासाठी तर ही योजना खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो जे शेतकरी मित्र फळाची शेती करतात त्यांच्यासाठी आता फळपीक विमा योजना चालू करण्यात आलेली आहे.

मित्रांनो आता या योजनेअंतर्गत मृगबहार आंबिया बहार अशा दोन ऋतूंसाठी शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे अर्ज भरून घेतलेले आहेत.

मित्रांनो ही योजना 26 जिल्ह्यांमध्ये फळबागांना लागू करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये खरीप फळ विमा सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. तर यासाठीच शेतकऱ्यांकडून पिक विमा योजनेत नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

मित्रांनो शेतकरी मित्र अधिक उत्पन्न होण्यासाठी फळबागांची शेती करतात. शेती करत असताना खूप मेहनत करावी लागते पण उत्पन्न जास्त असल्याने शेतकरी मित्र फळांची शेती करतात. आणि मित्रांनो फळाच्या शेतीला नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर धोका असतो आणि फळांचे नुकसान होते. यानेच शेतकऱ्यांना खूप मोठ्या तोटा होऊ शकतो हेच लक्षात घेऊन. फळ पिकालाही आता संरक्षण मिळावे. म्हणजेच नैसर्गिक आपत्ती पासून किंवा हवामानाच्या बदलापासून नुकसान झाले तर आता पिक विमा योजना चालू करण्यात आलेली आहे.

मित्रांनो ही योजना वर्ष 2023 24 साठी फळबागांना लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांना विमा नको असल्यास त्यांना आधी एक घोष पत्र द्यावे लागणार आहे. नाहीतर मित्रांनो त्यांचा पण विमा चालूच राहणार आहे आणि विम्याचे पैसे कापले जातील.

तर चला तर पुढे पाहूया कोण कोणत्या पिकांना विमा लागू असणार आहे.

मित्रांनो यामध्ये मोसंबी , डाळिंब , पेरू , चिकू , संत्रा , द्राक्ष , सिताफळ आणि लिंबू अशा प्रकारचा फळांसाठी विमा मिळणार आहे.

चला तर मित्रांनो यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती पुढे पाहूया.

जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला अर्ज करावा लागणार आहे.

यासाठी पुढील कागदपत्रे हे अत्यंत आवश्यक आहे.

आधार कार्ड ,
आठ अ उतारा ,
जमिनीचा सातबारा ,
पिक पेरा स्वयंघोष पत्र
बँक पासबुक ,
फळबागेचा फोटो ,
सामायिक क्षेत्र संमती पत्र.

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला वरील कागदपत्रे हे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Comment