Anganwadi workers salary | अंगणवाडी सेविका मानधन

Anganwadi workers salary अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर मानधनामध्ये किती वाढ झाली जाणून घ्या….! लहान मुलांना म्हणजेच शून्य ते सहा वयोगटातील छोट्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी तसेच त्यांचा बौद्धिक विकास घडवून आणण्यासाठी अंगणवाडी सेविका खूपच महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात, हे आपल्याला माहिती आहे. परंतु या सेविकांना मिळणारे मानधन किती आहे तसेच आतापर्यंत किती होते. मिळणाऱ्या मानधनांमध्ये त्यांना आतापर्यंत समाधान मानावे लागत असे. परंतु मिळणाऱ्या मानधनामध्ये त्यांच्या समस्यांचे देखील पूर्तता होत नसल्याचे दिसून येत होते. अशातच अंगणवाडी ताईचा दरवर्षीचा भाऊबीज मिळवण्याचा व मानधन वाढीचा संघर्ष कायमच सुरू होता. त्यांच्या मानधनात मात्र दोन अडीच हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव बऱ्याच दिवसांपासून अडकलेला होता परंतु आता त्यावर अंतिम निर्णय झालेला आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

मानधनाविषयी बोललो तर बरीच महागाई वाढलेली दिसली काम वाढले परंतु अंगणवाडी सेविकांचे मानधन मात्र तेवढेच राहिले. मात्र अंगणवाडी सेविका या तिचा गोडा समजल्या जाणाऱ्या छोट्या मुलांकडे स्वतःच्या मुलांपेक्षाही अधिक लक्ष देऊन त्यांच्या आयुष्याला अचूक दिशादर्शवण्याचे अमूल्य कार्य करत असतात. मात्र आता अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न सरकारने दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या अंगणवाड्यांचे माहिती उपलब्ध असते. खेडोपाड्यातील लहान मुलांना व गर्भवती मातांना देखील अंगणवाडी सेविका मार्गदर्शन करीत असतात. त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी अनेक सल्ले त्यांना देत असतात.

आपण सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी चा विचार केला असता त्या जिल्ह्यात 4,200 अंगणवाड्या असून त्या ठिकाणी 3,800 अंगणवाडी सेविका व 4,000 मदतनीस काम करतात. बहुतेक अंगणवाडी सेविकांचा उदरनिर्वाह हा अंगणवाडी मधून मिळणाऱ्या दर महिन्याच्या मासिक पगारातूनच होत असतो. सरकार सांगेल ते काम अचूकपणे करणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना मानधन कमी आणि प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना लाखोंची पगारे अशी वस्तुस्थिती आहे मात्र काही वर्षांपासून अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी संघर्ष केला व त्यांना दिवाळीत भाऊबीज म्हणून प्रत्येकी दोन दोन हजार रुपये दिले जातात. आता ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली परंतु त्यांचे मानधन वाढवून अंगणवाडी सेविकांना कायमचा दिल्यास देण्याचा प्रस्ताव शासनाने तयार केला आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांचे रिक्त पदे असून ती आता भरली जाणार आहेत.

आता आपल्याला शाळा बाह्य मुलांचे प्रमाण खूप कमी झालेली दिसते किंवा हालाखीची परिस्थिती असल्याने पूर्वी न शिकणाऱ्यांची संख्या बरीच होती परंतु काही वर्षानंतर त्यामध्ये बदल झाला व गावोगावी गरजेच्या ठिकाणी अंगणवाड्यांची उभारणी झाली. त्यासाठी त्यांनी नेमलेल्या अंगणवाडीमध्ये सेविका मदतनीस व पर्यवेक्षक यांच्या समन्वयातून प्रत्येक कुटुंबातील मुले शाळेत येऊ लागली. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचे प्रमाण खूप कमी झाले व त्यांना शाळेत येण्याची सवय लागली.

यामध्ये अंगणवाडी सेविकांचा खूप मोठा वाटा आहे; परंतु त्यांचे मानधन वाढवण्याचा विचार सरकारने केला आहे. राज्यभरात या सेविका दारिद्र्यरेषेखालील असून पोषक आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण व आरोग्य सेवा इत्यादी सेवा देणाऱ्या व सेविकांना आजपर्यंत खूपच कमी वेतन मिळत होते. महागाई भत्ता त्यांना कधीही मिळाला नाही त्यांना मिळणाऱ्या मानधनांमध्येच वाढ करण्यासाठी त्या वेळोवेळी धरणा मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधत आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये कायम करून त्यांना भरीव स्वरूपाचे मानधन द्या तसेच दर महिन्याला अर्ध्या मानधन एवढी पेन्शन अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. सध्या अंगणवाडी सेविकांना 8,300 मिनी सेविकांना 5,900 व मदतनिसांना 4,450 रुपये मानधन मिळते. एवढी महागाई वाढत असताना सुद्धा त्यांच्या मानधनांमध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नव्हती.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अत्यंत कमी मानधनावर काम केल्यामुळे त्या आपल्या सेवाकाळात मानधनातून काहीही न साध्य करू शकल्या नाही. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर म्हातार पण एकदा निर्वाह करणे आवश्यक विचार करणे अशक्य होते, म्हणून म्हातारपणी जगण्यासाठी त्यांना अर्ध्या मानधना एवढे तरी दरमहा पेन्शन देण्यात यावी अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. तर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जो वचननामा जाहीर केला होता त्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ व त्यांच्या संचारातीमध्ये सुधारण्याचे वचन दिले होते त्याबाबतीत महाराष्ट्र सरकारने वचनपूर्ती केल्यामुळे दोन लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व प्रतचर झाला होता.

महाराष्ट्र सरकार व मंत्री महिला व बालविकास विभाग यांच्याकडे आपल्या मागण्यांचा आग्रह धरण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ व अंगणवाडी कर्मचारी सभा या संघटनांतर्फे दिनांक 20 ते 25 जून या काळामध्ये यवतमाळ ते अमरावती येथे महिला व बालविकास विभाग मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयावर 100 किमीची पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री, महिला व बालविकास विभाग यांनी सदर संघटनांच्या प्रतिनिधींना दिनांक 17 जून 2022 रोजी चर्चा करता बोलावले होते.

या बैठकीत मानधनाचा प्रस्ताव दरमहा अर्ध्या मानधनाएवढी दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्तावाला वित्त विभागाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांना आश्वासन दिले. त्याचप्रमाणे शिष्टमंडळाने नानाभाऊ पटोळे यांची भेट घेतली त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाद व दरमहा पेन्शन बाबत पाठपुरावा करण्याची आश्वासन शिष्टमंडळाला दिले. अशाप्रकारे आता मात्र अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक व मदतनीस यांच्या पगारामध्ये वेतन वाढ करण्यात आली आहे. सध्या अंगणवाडी सेविकांना 8,300 मिनी सेविकांना 5,900 व मदतनिसांना 4,450 रुपये मानधन मिळते.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment