Aadhaar Smart Card only 50Rs at Home | आधार स्मार्ट कार्ड बोलवा घरी फक्त 50 रुपयात

Aadhaar Smart Card only 50Rs at Home आधार स्मार्ट कार्ड 50 रुपयांमध्ये घरी बोलवा…. त्याविषयी सविस्तर माहिती :भारतात आधार कार्ड एक मुख्य दस्तऐवज असून आता युआयडीएआयने आधार कार्ड धारकांसाठी अपडेट जाहीर केले असून आधार कार्ड प्रिंट करून प्लास्टिक कार्डच्या रूपात बनवण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र सुरक्षिततेच्या कारणांमुळे अशा प्रकारचे कार्ड बनवणाऱ्या युआयडीएआयने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आधार कार्ड धारकांच्या गोपनीय माहितीचे उल्लंघन होण्याचा धोका यामुळे वाढत असल्याचे सांगितले आहे. पीव्हीसी आधार कार्ड प्रमाणित सरकारी एजन्सी कडून प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध असून आता केवळ पन्नास रुपयांमध्ये ग्राहक आधार कार्ड ऑर्डर करू शकतो.

बरेच आधार कार्ड धारक बाजारांमध्ये आपले डुबलीकेट आधार कार्ड बनवून घेतात. परंतु असे आधार कार्ड आता अवैध असून हे कार्ड ग्राह्य धरले जाणार नाहीत. बाजारात बनवलेले आधारचे स्मार्ट कार्ड अवैध आहे असे स्पष्टीकरण आधार कार्ड बनवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India) म्हणजेच आधार प्राधिकरणाने दिले आहे. आधार नोंदणी केल्यानंतर बरेच लोक बाजारातून पीव्हीसी आधार कार्ड बनवून घेतात परंतु अशी कार्डे आता चालणार नाही. असे आधार प्राधिकरणाने समाज माध्यमात जारी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

बाजारात बनवलेल्या आधारच्या स्मार्ट काळात अनेक सुरक्षा विषयक उनिवा असतात खरे म्हणजे अशा कार्डात कोणत्याच सुरक्षा विषयक विचार नसते त्यामुळे असे कार्डांना आम्ही अवैध करत घोषित करत आहोत. असे प्राधिकरणाने म्हटले आहे. मूळ आधार कार्ड प्रणालीच्या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही हे आधार कार्ड प्राप्त करू शकता. ती वेबसाईट पुढील प्रमाणे आहे. myaadhaar.uidai.gov.in या साईटवर गेल्यानंतर ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड या पर्यायावर क्लिक करावे नंतर बारा अंकी आधार कार्ड अथवा 28 अंकी नोंदणी आयटी टाका. सुरक्षा कोड भरून त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. त्यानंतर अटी व शर्ती यांना स्वीकृती देऊन ओटीपी पडताळणी सबमिट बटन दाबल्यानंतर पेमेंट ऑप्शन दिसेल, तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे पैसे ते भरू शकता. पैसे पे झाल्यानंतर पावती मिळेल आणि कार्ड पोस्टाने घरपोच येईल.

पीव्हीसी कार्ड महत्त्वाचे असून आपल्याला आधारचे पीव्हीसी काढावी असेल तर ते केवळ 50 रुपये भरून आपण अधिकृतरित्या मिळवू शकतो. ते प्राधिकरणाकडून पोस्टाने पाठवली जाईल. मूळ आधार पीव्हीसी कार्ड डीजीटली साइन सुरक्षित क्यू आर कोड असतो. ते छायाचित्रांसह येते. त्यात लोकसंख्येची तपशील असतो. तसेच सर्व सुरक्षा फीचरही असतात. त्यामुळे बाजारात बनवलेल्या आधार कार्डमध्ये ह्या सुरक्षा किंवा फीचर्स नसतात. त्यामुळे धोका वाढण्याचा संभव जास्त असतो.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment